Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

मुंबईत ३० जूनला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा: सरकार विरोधात जनतेचे मोठे शक्तीप्रदर्शन

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत प्रस्तावित केलेल्या ‘उपवर्गीकरण’ (Sub-categorization) प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यासाठी ‘उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती’ आक्रमक झाली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आगामी ३० जून २०२६ रोजी मुंबई येथे विधान भवनावर विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. ​संघर्ष समितीचा सरकारला सवाल उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, हा मोर्चा कोणत्याही एका जाती किंवा समूहाच्या विरोधात नसून, आरक्षणाचे उपवर्गीकरण करू पाहणाऱ्या राज्य सरकारविरोधात आहे. समितीच्या मते, “उपवर्गीकरण हा आरक्षणावरील उपाय नसून, तो एक भयंकर रोग आहे जो दलित-आदिवासी समुदायाची एकता कमकुवत करेल.” समितीने सरकारला सवाल केला आहे की, जर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आणि धनगर समाजाबाबत आरक्षण नाकारल्यानंतरही सरकार पर्यायी मार्गांचा विचार करू शकते, तर दलित-आदिवासींच्या बाबतीतच उपवर्गीकरणाची घाई का केली जात आहे?

प्रमुख मागण्या आणि भूमिका: संविधानिक हक्क: संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक दर्जा दिला आहे. त्याचे विभाजन करणे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा समितीने केला आहे. पारदर्शकतेचा अभाव: न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही, तसेच या प्रक्रियेला अद्याप कॅबिनेटची अधिकृत मान्यताही मिळालेली नाही. ​राजकीय हेतू: सरकार सोयीच्या राजकारणासाठी २०२४ च्या न्यायालयीन निकालांचा आधार घेत आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement Box

राज्यातील समस्त फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे मिलिंद बांबोळे (गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, बिआरएसपी), रोहिदासजी राऊत (केंद्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष), अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, हंसराज उंदीरवाडे, प्रल्हाद रायपुरे, हंसराज बडोले, राजेंद्र बांबोडे, तुलाराम राऊत आणि प्रा. गौतम डांगे यांनी आपल्या संघटनांचे झेंडे व बॅनर्स घेऊन मुंबईत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.
आज फोकस में

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.
आज फोकस में

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?
आज फोकस में

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक
आज फोकस में

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ
आज फोकस में

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!
आज फोकस में

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

शनिवार, 11 जुलाई 2026

आज का सुविचार

समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp