
Written by
लोकविजन न्युज
गडचिरोली : गडचिरोली परिसराचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले ख्यातनाम सुफी संत हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण विदर्भ व सीमावर्ती भागातील लाखो अनुयायांवर शोककळा पसरली आहे. सर्वधर्मसमभाव : हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांचे ते मोठे श्रद्धास्थान होते. १९९६ पासून गडचिरोलीत वास्तव्य करून त्यांनी लाखो भक्तांना आध्यात्मिक आधार दिला.खानकाह : गडचिरोली येथील त्यांची खानकाह संकटात सापडलेल्या आणि व्याधीग्रस्त लोकांसाठी आशेचा किरण मानली जाते. कुटुंब: त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सय्यद हबीब हुसेन (हुसेन बाबा) आणि मोठा भक्तपरिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण आदरांजली! 💐






