
गडचिरोली : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी बीआरएसपीच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे विविध सामाजिक व समविचारी संघटनांच्या सहभागातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बँका तसेच मान्यवरांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रती वितरित करून संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत गडचिरोली
येथील एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले. तसेच चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार घोरुडे साहेब आणि उपविभागीय अधिकारी खलाटे साहेबयांना संविधान प्रस्ताविकेच्या प्रती भेट देण्यात आल्या. जिल्ह्यातील कंत्राटदार अरुणजी निंभोरकर यांनाही संविधान प्रस्ताविका देऊन संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे, युवा अध्यक्ष वैभव दरडे, ज्येष्ठ नेते चंद्रप्रकाश गेडाम, जानकीराम रामटेके यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संविधानातील मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.











