
गडचिरोली:अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून नगरसेविका शिल्पा हेमके यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वतीने आज गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर आज, १४ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला.
या शिष्टमंडळात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय जनबंधू, माजी जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमिटीचे सदस्य मिलिंद बांबोळे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सादर केलेल्या तक्रारीवर आणि पुराव्यांवर लवकरच सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.











