
गडचिरोली:पाच पिढ्यांचा आणि १२४ वर्षांहून अधिक समृद्ध सुवर्ण वारसा लाभलेले मध्य भारतातील अग्रगण्य ‘रोकडे ज्वेलर्स’ आता गडचिरोलीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील या नवीन व भव्य शोरूमचा तीन दिवसीय उद्घाटन सोहळा १५, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला ‘भाभी जी घर पर है!’ फेम आणि ‘बिग बॉस ११’ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स :
सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) ५०% सूट.
हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पूर्ण सूट.
२२ कॅरेट दागिन्यांची घडणावळ अवघ्या ५% पासून सुरू.
पुढील खरेदीसाठी घडणावळीवर २५% सुटीचे व्हाउचर.
दागिन्यांचे विस्तृत दालन: १००% हॉलमार्क असलेले सोने, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्रायडल, चांदी आणि १८ कॅरेटचे लाईटवेट दागिने एकाच छताखाली.
परवडणारे हिरे: डायमंड ज्वेलरीची श्रेणी अवघ्या १९,९९९ रुपयांपासून सुरू.
राशिरत्न क्रय सुरक्षा: २१ दिवसांचा ट्रायल पिरीयड व मनी बॅक गॅरंटी.
पारदर्शकता व सुरक्षा: कॅरेटमीटरद्वारे शुद्धता तपासणी, सोने वितळवण्याचे थेट रेकॉर्डिंग आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था.
सुलभ खरेदी योजना: ग्राहकांसाठी डिजिटल गोल्ड, मंथली इन्स्टॉलमेंट, फ्युचर वेडिंग यासह ६ नवीन ज्वेलरी प्लॅन्स उपलब्ध.
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा यांच्यानंतर गडचिरोलीतील हे रोकडे समूहाचे ११ वे शोरूम असून लवकरच यवतमाळ, नाशिक, पुणे, मुंबईसह इतर राज्यांतही विस्तार करण्याची योजना असल्याचे रोकडे परिवाराने स्पष्ट केले आहे.











