Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

राष्ट्रीय स्तरावर सहकारी बँकिंगचा झेंडा! नागपूर नागरिक सहकारी बँकेला ‘जोखीम व्यवस्थापन’ उत्कृष्टता पुरस्कार

Author Image
Written by
लोकविजन न्युज

नवी दिल्ली / नागपूर : सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाच्या आणि पहिल्या ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ (Indian Cooperative Summit & Excellence Awards 2026) मध्ये नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडने आपल्या भक्कम कार्यप्रणालीचा आणि दूरदृष्टीचा ठसा उमटवला आहे. देशभरातून सहभागी झालेल्या ३०० हून अधिक सहकारी बँका आणि निवडक सुमारे ४० विजेत्या बँकांच्या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवत बँकेने ‘जोखीम व्यवस्थापन’ (Risk Management) श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टता पुरस्कार पटकावला आहे. हा सन्मान संपूर्ण सहकार चळवळीसाठी आणि विशेषतः विदर्भासह तीन राज्यांत विस्तारलेल्या बँकेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.

सोहळ्याचे ठळक मुद्दे – सन्मानाचा सोहळा: १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील ‘द अशोक हॉटेल’ मध्ये हा भव्य सोहळा पार पडला. प्रमुख मान्यवर: माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेशजी प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख श्री. डी. के. सिंह तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सतीशजी मराठे, श्री. गौतमजी ठाकूर व श्री. ज्योतीद्रभाई मेहता यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Advertisement Box

​बँकेचे प्रतिनिधी: बँकेचे अध्यक्ष आमदार प्रा. संजयजी भेंडे, उपाध्यक्ष मा. अशोकजी अग्रवाल (गोयल) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशुतोषजी पाठक यांनी हा गौरव स्वीकारला.
​प्रगत जोखीम व्यवस्थापन: बँकेच्या यशाची गुरुकिल्ली ​बँकिंग क्षेत्रात सुरक्षितता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी नागपूर नागरिक सहकारी बँकेने सर्वसमावेशक जोखीम व्यवस्थापन प्रणाली उभारली आहे:

​प्रमुख मॉडेल्स: क्रेडिट रिस्क असेसमेंट, क्रेडिट रिस्क स्ट्रेस टेस्टिंग, लिक्विडिटी रिस्क स्ट्रेस टेस्टिंग, मार्केट रिस्क असेसमेंट, ऑपरेशनल रिस्क असेसमेंट आणि कम्प्लायन्स रिस्क असेसमेंट.

​तंत्रज्ञान व विश्लेषण: जोखमींची वेळेवर ओळख, मोजमाप आणि संभाव्य परिणामांचे अचूक विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्यासाठी बँकेने मॉडेल व्हॅलिडेशन, ऑटोमेशन, रिस्क डॅशबोर्ड्स आणि रिस्क मिटिगेशन मूल्यमापनावर विशेष भर दिला आहे.

​विस्तार, आधुनिकता आणि विश्वासाची पंचसूत्री

​महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये ५३ शाखांचे जाळे असलेल्या या बँकेने एप्रिल २०२६ मध्ये मेहकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे यशस्वी विलीनीकरण करून आपल्या वाटचालीत नवा अध्याय जोडला. बँकेचे स्वतःचे अत्याधुनिक डेटा सेंटर, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आणि सुमारे २०० आसनक्षमतेचे आधुनिक सभागृह असलेले नूतनीकरण केलेले मुख्यालय बँकेच्या प्रगतीची साक्ष देतात.

​सुरक्षित बँकिंग, प्रभावी जोखीम व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा अढळ विश्वास या पंचसूत्रीवर आधारित ही घोडदौड संचालक मंडळाचे दूरदर्शी नेतृत्व, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि लाखो ग्राहक व सभासदांच्या विश्वासाचे फलित असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp