
राजगट्टा चक / जेप्रा: वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आणि वीज जोडण्यांच्या प्रमाणात वीज वितरण पेट्यांची (Distribution Board/DP) संख्या अत्यंत तोकडी असल्याने राजगट्टा चक आणि जेप्रा या गावांना सध्या भीषण वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. गावांमध्ये सातत्याने होणारा तीव्र व्होल्टेज ड्रॉप (कमी दाबाचा वीजपुरवठा) आणि वारंवार होणाऱ्या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
वाढत्या लोकसंख्येपुढे जुनी यंत्रणा अपुरी
राजगट्टा चक आणि जेप्रा या दोन्ही गावांचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला आहे. नवीन घरे आणि शेतीपंपांच्या जोडण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे; मात्र त्या प्रमाणात महावितरणकडून आवश्यक त्या क्षमतेच्या नव्या वितरण पेट्या किंवा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेले नाहीत. मर्यादित डीपींवर अतिरिक्त भार (ओव्हरलोड) पडत असल्याने वीजपुरवठा सतत खंडित होतो किंवा त्याचा दाब अत्यंत कमी होतो.
शेती आणि उपकरणांचे मोठे नुकसान
कमी दाबामुळे शेतकऱ्यांचे सिंचन पंप सुरूच होत नाहीत, तर काही वेळा व्होल्टेजच्या अचानक चढ-उतारामुळे पंपांच्या मोटारी आणि स्टार्टर जळून खाक होत आहेत. पीक वाचवण्यासाठी पाणी देणे गरजेचे असताना ही समस्या शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. याशिवाय घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज, मिक्सर यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल
रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव आणि मंद दिवा यांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे. उकाड्यामुळे वृद्ध आणि लहान बालकांचे हाल होत असून पिण्याच्या पाण्याच्या योजनाही वीजअभावी ठप्प पडत आहेत.


कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा









