Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

Author Image
Written by
लोकविजन न्युज

नागपुर :- दिनांक 20 ऑक्टोबर मंगळवार 2026 ला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विदर्भ प्रदेश द्वारा दुपारी ठीक 12:30 वाजता रवी भवन नागपूर येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांच्या मार्गदर्शनात पार पडली यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील विदर्भाचे संयोजक विशेष फुटाणे तसेच पूर्व विदर्भातील संपूर्ण विदर्भाचे पदाधिकारी तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व समविचारी संघटना आणि पक्षाच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर 2026 ला नागपूर येथे भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.

1. महाराष्ट्र सरकारने जात भिंती व द्वेष मजबूत करणारे एस सी मध्ये फूट पाडण्यासाठी एस सी उपवर्गीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करून, राज्यात नोकर भरती पदोन्नती व नियमित्ता धोरणाचा पुरस्कार करून दलित आदिवासी , भटके विमुक्त व ओबीसींना न्याय दिलाच पाहिजे.

Advertisement Box

2. देशभरातील ओबीसी स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी आगामी जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम व त्याद्वारे जनगणना झाल्याशिवाय राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण निश्चित होत नसल्याचे राज्य सरकारने त्वरित ओबीसी स्वतंत्र जनगणना ठराव विधिमंडळात पार करून केंद्राकडे पाठवून पास करून घेणे

3. महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रम शाळा विद्यार्थी वस्तीगृहातील दुरावस्था नष्ट करण्यासाठी सरकार विमुक्त डॉक्टर साळुंखे समिती अहवाल 2016 जाहीर करून त्वरित अंमलबजावणी करावी व सामाजिक न्याय विभागाला व आदिवासी विकास विभाग अंतर्गत विद्यार्थी जेवणाची वर्तमान केंद्रीय ठेकेदारी पद्धत रद्द करून जिल्हा विभाग स्तरावर टेंडर प्रक्रिया राबवावी.

4. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एससी एसटी विभागाची करोडो रुपयाची निधी चोरी बंद करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित एससी एसटी आर्थिक बजेट आऊटन व उपयुक्त स्वतंत्र कायदा करून तातडीने अंमलबजावणी करावी

5. राज्यातील गायरान वनखाते सरकारी जमिनीवरील भूमी हिनांची 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमित करावी वन हक्क दावे त्वरित निकाली काढावेत व भूमिहीनांना शासकीय योजनेनुसार जमीन वाटप करावे

6. राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील वर्षानुवर्षी सफाई काम करणाऱ्या हंगामी सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे त्यांना सरकारच्या 1987 पासून अनेक वर्षा अनेक आदेशानुसार लाडके मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे व सफाई कामगार मुला-मुलींना शिक्षणासाठी स्वतंत्र न योजना सरकारने राबविल्या पाहिजेत.

7. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण कोर्टाने दोन वेळा फेटाळले तरी सध्याच्या सरकारने तिसऱ्यांदा दहा टक्के आरक्षण दिले आहे त्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र मराठा कक्षाची निर्मिती केली आहे परंतु एससी एसटी ओबीसी डीपी एन टी व्ही जे एन टी च्या घटनात्मक व कायदेशीर आरक्षण पदोन्नती विरोधात सरकारची कबड्डी बंद झालीच पाहिजे.

8. राज्यातील 10% मुस्लिमांना मुंबई उच्च न्यायालयाने बहाल केलेले शिक्षणातील दहा टक्के आरक्षण हे फडणवीस सरकारने रद्द केले आहे ते धोरण बदलवून मुस्लिमांसाठी दहा टक्के शैक्षणिक आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.

9. लाडकी बहीण योजना आधारित राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रत्येक अल्पभूधारक वय वर्ष 55 वरील शेतकऱ्यास मासिक रुपये 5000 शासकीय शेतकरी अनुदान सरकारने दिलेच पाहिजे.

10. राज्य सरकारने भांडवलदार दर्जीनी विकास धोरणे रद्द करून राज्यात समतोल विकास नोकर निर्मिती गुंतवणूक करावी व विदर्भातील जनतेस स्वतंत्र विदर्भ राज्याचे नागपूर करारानुसार स्वतंत्र राज्य निर्माण करावे.

इत्यादी महत्त्वाच्या मुद्यांना घेऊन येत्या 15 डिसेंबरला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व समविचारी पक्ष संघटना या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन विधानभवनावरती धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है असा निर्धार व्यक्त करत आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी हजारोच्या संख्येने या मोर्चात सामील होण्याचे आवाहन पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांनी केला आहे यावेळी बोलताना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी हे नेहमी मुद्द्यांना घेऊन चालणारा आंदोलन करणारा पक्ष आहे . प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील होणार आहेत.

<span class=आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा">
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp