
कोरपना (जि. चंद्रपूर) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांना गणना प्रपत्रे निर्गमित करण्यात आली होती, परंतु त्यांची नावे ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ७० राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार कोरपना यांच्या कार्यालयाकडून १८ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात आली आहे.
या प्रसिद्धीपत्रकानुसार, संबंधित सर्व मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे जाहीर आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कोरपना सोनाली टेटगुरे यांनी केले आहे. मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन वेळीच आपल्या नावाची खात्री व नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे..
प्रारूप यादीत नाव नसलेल्या ASDD प्रवर्गातील मतदारांना दिलासा; अंतिम यादीत नाव नोंदविण्याची संधी
कोरपना तहसील कार्यालयाचे आवाहन : बीएलओशी संपर्क साधून अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करा










