Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची गडचिरोली जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. चामोर्शी रोडवरील चांदेकर बिल्डिंग येथील जिल्हा कार्यालयात आज, २७ सप्टेंबर रोजी आयोजित या बैठकीत पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा तसेच आगामी हिवाळी अधिवेशनावर गडचिरोलीतून ५०० लोकांचा मोर्चा नागपूरला नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

​बैठकीला विदर्भ अध्यक्ष तथा संयोजक मा. विशेष फुटाणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर पक्षाची भूमिका यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात आक्रमक रणनीती आखून पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Advertisement Box

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे यांनी केले. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर जनतेच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातून किमान ५०० कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होतील, अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली.

​या महत्त्वपूर्ण बैठकीस वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. जनबंधू, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष इम्रान सय्यद, तालुकाध्यक्ष बांबोडे, शहराध्यक्ष आकाश बांबोडे, पक्षाचे महासचिव अरविंद वाळके, ज्येष्ठ नेते विलास कुंभारे, ज्येष्ठ प्रवक्ते राजभाऊ भगत, चंद्रप्रकाश गेडाम, युवा अध्यक्ष वैभव दरडे, तुषार रामटेके, बंडू वाघमारे, चंद्रकांत रायपुरे, मिथुन गेडाम यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीड वर्षांपासून फरार फसवणुकीच्या आरोपीला गडचांदूर पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात
आज फोकस में

दीड वर्षांपासून फरार फसवणुकीच्या आरोपीला गडचांदूर पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

रविवार, 29 नवंबर 2026

आज का सुविचार

पुस्तकें, अच्छे मित्र और साफ अंतःकरण: यही एक आदर्श जीवन है। ज्ञान में किया गया निवेश आपको वह प्रतिफल देता है जिसे कोई आपसे छीन नहीं सकता।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp