Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोलीत विकासाचा बोजवारा: खर्पुंडी-दिबना-जेफ्रा-अमीर्झा मार्ग दुरवस्थेच्या विळख्यात; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली : जिल्ह्यातील खर्पुंडी ते अमीर्झा (वाया दिबना-जेफ्रा) या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याचे त्वरित रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

प्रमुख समस्या : ​रस्त्याचे रुंदीकरण नाही: वाढत्या वाहतुकीनुसार या मार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते, परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा रस्ता आजही अरुंदच राहिला आहे. रस्ते च्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे आणि अतिक्रमणामुळे हा मार्ग अधिकच अरुंद झाला आहे, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. विशेष म्हणजे, ही समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे साधे कर्तव्यही स्थानिक यंत्रणा बजावत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग अनेक गावांसाठी जीवनवाहिनी आहे. परंतु, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अरुंद रस्ता आणि वाढलेले गवत यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा करणे कठीण झाले आहे. स्थानिक पातळीवर समस्या सुटत नसल्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्ते विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना, ग्रामीण भागातील अशा महत्त्वाच्या मार्गांची ही दुर्दशा का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp