Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली: आज दिनांक १० जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे आपल्या बँकेच्या शाखेचा ८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. ​कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मंचावर बँकेचे संचालक श्री. अनिलजी गोविंदानी आणि श्री. सचिनजी कुहीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लीड बँक मॅनेजर श्री. प्रशांतजी बोधरे, गड़चिरोली नागरी सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक श्री. पोटवार साहेब, खादी व ग्रामोद्योग बोर्डाचे (KVIB) विभाग प्रमुख श्री. भास्कर मेश्राम आणि नगरसेवक श्री. सतीशभाऊ विधाते उपस्थित होते.

​कर्ज योजनांचे विमोचन

वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने विविध शासकीय आणि अनुदान पात्र कर्ज योजनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या योजनांची सविस्तर माहिती खादी विकास व ग्रामोद्योग बोर्डाचे प्रमुख श्री. भास्कर मेश्राम आणि बँकेचे महाव्यवस्थापक श्री. श्रीकांतजी वनकर यांनी उपस्थितांना दिली.

​बँकेची प्रगती

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक श्री. अनिलजी गोविंदानी यांनी बँकेच्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच गेल्या ८ वर्षांत बँकेने आणि विशेषतः गडचिरोली शाखेने केलेल्या प्रगतीचा आलेख मांडत बँकेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

​कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवर, ग्राहक आणि हितचिंतकांचे आभार शाखा व्यवस्थापक श्री. सचिन चोलूरवार यांनी मानले. या दिमाखदार सोहळ्याला ग्राहकांची मोठी उपस्थिती लाभली होती.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp