Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

अधिक्षक अभियंता कार्यालय समोर स्मार्ट मिटर व विज दरवाढ विरोधात तीव्र हल्ला बोल आक्रोश आंदोलन

Author Image
Written by
लोकविजन न्युज

दि. ४ ऑगस्ट मंगळवारी दु. १२ वा. अधिक्षक अभियंता कार्यालयावर धडक. केंद्र व राज्य सरकार आता वीज कधीही कितीही महाग करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी स्मार्ट मीटर लागण्याची योजना सुरू केली आहे .आपल्या शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुपचूप काही ठिकाणी बळजबरीने स्मार्ट मीटर खाजगी कंपन्यांकडून लावणे सुरू आहे. स्मार्ट मीटर लावल्याने कित्येक ग्राहकांचे विज बिल वाजवी पेक्षा दोन-तीन पट जास्त आलेले आहेत. याचा आपणही अनुभव घेतला आहे. २०२४ ला विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनतेचा या स्मार्ट मीटरला विरोध पाहून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेत्यांनी स्मार्ट मीटर घरोघरी लावण्यात येणार नाही .असे जाहीर केले होते. परंतु भाजप सत्तेत आली व स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरी लावण्याची योजना गतीने राबवित आहे. नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत संपूर्ण देशासाठी स्मार्ट मीटरचे कंत्राट मोदीचे मित्र अदानी व इतर खाजगी कंपन्यांना दिलेले आहेत. देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. प्रीपेड मोबाईल व फाॅस्टटॅग द्वारे टोलचे मनमानी पैसे कपात केली जातात. त्याच प्रमाणे स्मार्ट मीटर द्वारे सुद्धा होणार आहे. प्रीपेड मीटर रिचार्ज मारून वीज वापरावी लागेल व रिचार्ज संपला की आपोआप वीज कट होईल. व रिचार्ज केल्यावर ती परत येईल .या विरोधात दि.४ ऑगस्ट ला दुपारी १२ वा.अधिक्षक अभियंता कार्यालय गडचिरोली समोर तीव्र निदर्शने हल्ला बोल आंदोलन करुन मा‌.पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री,मा. देवेंद्र फडणवीस यांना अधिक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.सोबतच जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावू नका व माझी परवानगी नसतांना लावलेला स्मार्ट मीटर काढून घ्यावा व जुना कायम ठेवावा.असे प्रत्येकांनी भरलेल्या अर्जाचा गठ्ठा‌ देण्यात आला. मा. अधीक्षक अभियंता मोर्चासमोर येऊन सविस्तर चर्चा केली व ज्या लोकांच्या तक्रारी आहेत, अर्ज दिले आहेत त्यांची चौकशी करण्यात येईल व ज्यांचे बिल जास्त आलेले आहेत त्यांचे बिल कमी करून देण्यात येतील व ज्यांचे मीटर वाजवीपेक्षा जास्त गतीने फिरत असतील ते मीटर बदलून देण्यात येतील असे आश्वासन दिले.ज्यांच्या घरावर सोलर लावलेला आहे. त्यांनी वीज ३.५० रु. प्रति दराने युनिट विकत घेतली जाते व १७.५० रु. प्रति युनिट या दराने त्यांना महावितरण कडून वीज विकत घ्यावी लागेल. हे षडयंत्र ओळखा, अंबानी – अदानी यांच्या सोलर कंपन्या चालवण्यासाठी भाजप सरकारने सोलर योजना आणून जनतेला लुटण्याचा ठेका हा अदानी एन.सी.सी. माॅन्टेकार्लो या खाजगी कंपन्यांना दिलेला आहे. ज्या स्मार्ट मीटर ची किंमत ६ हजार रुपयापेक्षा जास्त नसावी, असे सरकारी अधिकारी सांगतात. तो मीटर सरकारने १२००० रुपये किंमतीला विकत घेतला‌ आहे. या मीटरची किंमत,इतर खर्च यासाठी महावितरण कंपनीने कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा व्याज हा ग्राहकांकडून वसून केला जाईल. यासाठी महावितरण कंपनी विज दरवाढ करून हे सर्व वसून करणार आहे. जनतेच्या आक्रोशाकडे त्यांचे लक्ष नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सतत वाढणाऱ्या विजदराच्या विरोधात अधिक्षक अभियंता कार्यालया गडचिरोली समोर निदर्शने करण्यात आली, हजारोंच्या संख्येने लोकांनी भाग घेतला.या आंदोलनाचे नेतृत्व भाकपाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्याध्यक्ष काॅ. डाॅ.महेश कोपुलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, भाकपाचे जिल्हा सेक्रेटरी काॅ. देवराव चवळे,बिल.आर.एस.पी.चे जिल्हाध्यक्ष मिलींद बांबोळे, एड जगदिश मेश्राम, सचिन मोतकुरवार,सुरज जक्कुलवार, रोहिदास फुलझेले ता.सचिव ,जलील शेख,चन्नीलाल मोटघरे ,केवळराम‌ नागोसे, सुरेश फुकटे, हरिदास निखुरे,मारोतीर नरुले,ओंकार शेंडे, रामभाऊ काळबांधे, रमेश टेकाम,रूषी रामटेके,प्रा.प्रकाश दुधे,प्रा.राजन बोरकर,तुलाराम राऊत, अरविंद वाळके,वैभव दराडे, विलास कुंभारे, दयाराम पोटे,प्रदिप भैसारे, कल्पना रामटेके, सुमित्रा राऊत आदि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp