Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

अमलनाला धरणातील पाणी हिरवट; नगरपरिषद सतर्क, नागरिकांमध्ये संभ्रम

Author Image
Written by
Satish Maroti Jamdade

गडचांदूर :- गडचांदूर शहराची तहान भागविणाऱ्या अमलनाला धरणातील पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ५० हजार लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या धरणातील पाण्याच्या बदललेल्या रंगामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, सुमारे सात वर्षांपूर्वीही अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाले होते. मात्र त्यावेळी या पाण्याचा वापर प्रामुख्याने शेती व औद्योगिक कारणांसाठी केला जात होता. २०२२ पासून याच धरणातील पाणी गडचांदूर शहरासाठी पिण्याच्या वापरात येत असल्याने सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

पाण्याचा रंग हिरवा होण्यामागे नेमके कारण काय? जलाशयातील शेवाळ, जलवनस्पती अथवा अन्य रासायनिक घटकांमुळे हा बदल झाला आहे का? या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता आहे का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, अशा सूचना गडचांदूर नगरपरिषदेने नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला असून, पाण्याची तातडीने शास्त्रीय तपासणी मागणी होत आहे.

(नागरिकांना आम्ही विविध माध्यमातून पिण्या करिता पाण्याचा वापर करून नये असे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्या करिता शहरातील सर्व आरो प्लॅन्ट खुले केले आहे. काही ठिकाणी शुद्ध पीण्याचे पाणी टँकर द्वारे पोहचता करीत आहोत. 2018 मध्ये देखील तलावाचे पाणी असेच हिरवे झाले होते. संबंधित विभागाशी बातचीत सुरू असून तपासणी करिता पाण्याचे नमुने घेतले आहे :- नगराध्यक्ष निलेश ताजने नगरपरिषद गडचांदूर)

(पहाडावरील नाल्या, धोंड्यातून आणि सिमेंट कंपनीचा माइन्स मधून पाणी वाहत अमलनाला धरणात येत असल्याने पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने जबाबदारी घेत उपाय योजना सुरू केल्या आहे जिल्हा प्रशासनाने दखल घेत संशोधक पद्धतीने तपासणी करावी आणि पाणी हिरवे होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करावे:- मनोज भोजेकर सामाजिक कार्यकर्ता गडचांदूर)

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp