Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट असोसिएशनचा एल्गार,कोरपना तालुक्यात मेडिकल बंदला उत्स्फूर्त प्रतिसा

Author Image
Written by
लोकविजन न्युज

कोरपना : कोरपना तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक 20 मे 2026 ला ऑनलाईन औषध विक्री तसेच अव्यवसायिक पद्धतीने दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या मेडिकल बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील जवळपास १०० टक्के मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

मेडिकल व्यवसाय हा आरोग्य सेवेशी निगडित अत्यंत संवेदनशील व्यवसाय असून ऑनलाईन औषध विक्री व मनमानी डिस्काउंटमुळे स्थानिक मेडिकल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच अव्यवसायिक डिस्काउंटमुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून औषध व्यवसायाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

ऑनलाईन माध्यमातून काही औषधे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सहज उपलब्ध होत असल्याने युवकांमध्ये औषधांच्या गैरवापराचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. काही युवक नशेसाठी अशा औषधांचा वापर करत असल्याने समाजात आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे, सचिव विनोद चटप, सचिन रणदिवे, सुनील धोटे, योगेश दाभाडे, नितीन डोर्लीकर, मनोहर गोरे, जगदीश डाहुले, सोनाली वाघधरकर, शीतल धोटे, पुष्पा खंडाळकर आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोरपना तालुक्यातील अनेक फार्मासिस्ट गडचांदूर येथे एकत्र येत त्यांनी या बंदला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी तसेच अव्यवसायिक व अनधिकृत डिस्काउंट पद्धतीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या आंदोलनात तालुक्यातील सर्व मेडिकल व्यावसायिकांनी एकजूट दाखवत सहभाग नोंदविला. आंदोलनाला व्यापारी, नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp