
सविस्तर वृत्त: गडचिरोली | दिनांक ६ जून २०२६ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका मंडळाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या विशेष उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा चामोर्शी तालुका मंडळ प्रभारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
”वृक्ष हे आपल्या पृथ्वीचे फुफ्फुस आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे योग्य संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष भास्करजी भुर्रे, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, वासुदेव चिचघरे, ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, सोपान नैताम, खंडुसिंग खसावत, किशोर गटकोजवार, सतीश भांडेकर, जानुजी बोधलकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक पेड माँ के नाम” या अभियानातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला, तसेच केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची (जगवण्याची) जबाबदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.










