Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

मुंबईत ३० जूनला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा: सरकार विरोधात जनतेचे मोठे शक्तीप्रदर्शन

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत प्रस्तावित केलेल्या ‘उपवर्गीकरण’ (Sub-categorization) प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यासाठी ‘उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती’ आक्रमक झाली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आगामी ३० जून २०२६ रोजी मुंबई येथे विधान भवनावर विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. ​संघर्ष समितीचा सरकारला सवाल उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, हा मोर्चा कोणत्याही एका जाती किंवा समूहाच्या विरोधात नसून, आरक्षणाचे उपवर्गीकरण करू पाहणाऱ्या राज्य सरकारविरोधात आहे. समितीच्या मते, “उपवर्गीकरण हा आरक्षणावरील उपाय नसून, तो एक भयंकर रोग आहे जो दलित-आदिवासी समुदायाची एकता कमकुवत करेल.” समितीने सरकारला सवाल केला आहे की, जर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आणि धनगर समाजाबाबत आरक्षण नाकारल्यानंतरही सरकार पर्यायी मार्गांचा विचार करू शकते, तर दलित-आदिवासींच्या बाबतीतच उपवर्गीकरणाची घाई का केली जात आहे?

​प्रमुख मागण्या आणि भूमिका: संविधानिक हक्क: संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक दर्जा दिला आहे. त्याचे विभाजन करणे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा समितीने केला आहे. पारदर्शकतेचा अभाव: न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही, तसेच या प्रक्रियेला अद्याप कॅबिनेटची अधिकृत मान्यताही मिळालेली नाही. ​राजकीय हेतू: सरकार सोयीच्या राजकारणासाठी २०२४ च्या न्यायालयीन निकालांचा आधार घेत आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

​राज्यातील समस्त फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे मिलिंद बांबोळे (गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, बिआरएसपी), रोहिदासजी राऊत (केंद्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष), अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, हंसराज उंदीरवाडे, प्रल्हाद रायपुरे, हंसराज बडोले, राजेंद्र बांबोडे, तुलाराम राऊत आणि प्रा. गौतम डांगे यांनी आपल्या संघटनांचे झेंडे व बॅनर्स घेऊन मुंबईत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

​

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp