Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या ‘सेवा दिन’ म्हणून साजरा; केक कापण्यावर बंदी

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली, ३० जून २०२६:भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोलीचे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या, बुधवार, १ जुलै रोजी अत्यंत साधेपणाने आणि समाजसेवेच्या भावनेने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांना ‘केक’ न कापता जनसेवेवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभराचे नियोजित कार्यक्रम:

Advertisement Box

​डॉ. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:

​सकाळी ८:००: चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण.

​सकाळी ९:००: सेमाना देवस्थान येथे दर्शन, पूजा-अर्चा आणि त्यानंतर परिसरात वृक्षारोपण.

​सकाळी १०:००: वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भेट देऊन त्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप.

​सकाळी ११:३०: महिला व बाल रुग्णालयात ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन आणि रुग्णांना फळ वाटप.

​सायंकाळी ६:००: गोविंदपूर (चामोर्शी हायवे) येथील ‘विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट’ येथे अभिष्टचिंतन सोहळा.

​समाजसेवेचा संकल्प: डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक उत्सव नसून तो समाजसेवेचा संकल्प आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या सेवाकार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी वाढदिवस केक न कापता पूर्णपणे सेवाकार्यातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.
आज फोकस में

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.
आज फोकस में

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?
आज फोकस में

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक
आज फोकस में

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ
आज फोकस में

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!
आज फोकस में

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

शनिवार, 11 जुलाई 2026

आज का सुविचार

समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp