Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सर्वांगीण विकासासाठी भाजपा सदैव प्रयत्नशील – आमदार देवराव भोंगळे

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचांदूर : गडचांदूर येथे काँग्रेस, शेतकरी संघटनेसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेशगडचांदूर: शहरी व ग्रामीण भागाचा कायापालट करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून गडचांदूर शहरासह ग्रामीण परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी केले. गडचांदूर येथील भाजपाचे शहर महामंत्री तथा नगर परिषद गटनेते श्री. सतीश बेतावार यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्य काँग्रेस, शेतकरी संघटनेसह विविध पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी (दि.१६) आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. आमदार देवराव भोंगळे पुढे म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांचा रथ वेगाने पुढे जात आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसमान्य जनतेच्या कल्याणासाठी शासकीय योजना थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये विनोद नगराळे, संपतकुमार खनके,रामदास वानखेडे, महेश नक्षीने, शंकर मुक्के, जनार्दन देवयानी, प्रवीण झंवर, युराज मशाखेत्री, विकास पचारे, चरण भरतवाज, रमाकांत देवकर, नितीन गोऊत्रे, अनिल मोहूर्ले, अक्षय चौधरी, गणेश नगराळे, अमोल सोरते, बापुराव गुरनुले, भरत सोनकांबळे यांचा समावेश आहे. आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश करीत असल्याची भावना यावेळी नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम,भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, राजुराचे भाजपा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, अमोल आसेकर, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, नगरसेवक हिमांशु नामवाड, सूरज पांडे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, शितल धोटे, सपना सेलोकर, सुरेश मेश्राम, कीर्ती वैरागडे, संगीता गाऊत्रे, हरि घोरे, अमोल थेरे, महेश घरोटे, महेश शर्मा, शिवाजी सेलोकर, सचिन भोयर, प्रफुल कावळे, विक्की उरकुडे, विश्वंभर झाम, सिनू इसारप, यांचेसह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp