
गडचिरोली-व्हिजन गडचिरोली 2047’ कार्यशाळेसाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत व विकसित जिल्हा म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने ‘व्हिजन गडचिरोली 2047’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, सिंचन, पायाभूत सुविधा, पर्यटन, आदिवासी विकास, वन व जलसंपदा, युवकांच्या संधी तसेच स्थानिक प्रश्न यावर सविस्तर विचारमंथन करून 2047 पर्यंतचा विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे.
दि. 16 व 17 ऑगस्ट 2026 रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच दैनिक, टीव्ही आणि पोर्टल पत्रकारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने BRSP गडचिरोली जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे यांची भेट घेऊन त्यांना ‘व्हिजन गडचिरोली 2047’ कार्यशाळेचे निमंत्रण देण्यात आले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे विचारमंथन करावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.








