Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

मेश्राम लेआउटमध्ये CSR निधीतून वॉटर एटीएमचे भूमिपूजन !!!

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचांदूर | दि. ८ ऑगस्ट २०२६ मेश्राम लेआउट, प्रभाग क्र. १ येथील हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व सहज उपलब्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने दी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स यांच्या CSR उपक्रमांतर्गत वॉटर एटीएमचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा जवळच उपलब्ध होणार असून, त्याचा थेट फायदा महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच संपूर्ण परिसरातील नागरिकांना होणार आहे. या सुविधेमुळे सार्वजनिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनमान सुधारण्यास निश्चितच मदत होईल. भूमिपूजनानंतर परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत संबंधित नगरपरिषद प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा व कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी माझ्यासमवेत उपनगराध्यक्ष संजूभाऊ मेंढी, बांधकाम सभापती रामसेवकभाऊ मोरे, नगरसेवक महेशभाऊ आवारी, सुरेशजी मेश्राम, नगरसेविका सारिका डोर्लीकर, अश्विनीताई कांबळे, प्रणिताताई उपाध्ये, मनिषाताई परचाके, तसेच माणिकगड युनिट हेड श्री. नवीन कौशिक, तसेच संजूभाऊ शेरकी, कुणाल पारखी व परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचांदूर नगरपरिषद आणि CSRच्या सहकार्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा निर्माण करणारा नसून, नागरिकांच्या मूलभूत गरजा, सार्वजनिक आरोग्य आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.नागरिकांच्या गरजा समजून घेत, त्यांच्या सहभागातून आणि सहकार्याने गडचांदूरच्या विकासाची वाटचाल अशीच पुढे सुरू राहील.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp