Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

“135 क्विंटल धान्य तफावत” नांदाफाटा रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

Author Image
Written by
Satish Maroti Jamdade

कोरपना (नांदा फाटा) :- कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील रास्त भाव दुकानातील कथित अनियमितता, धान्याचा काळाबाजार 135 क्विंटल धान्य तफावतीच्या प्रकरणात तातडीने अंतिम सुनावणी घेऊन रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. बहादुरकर यांच्याकडे करण्यात आली आहे. नांदा ग्रामपंचायत अंतर्गत नांदा फाटा येथे श्री. मनोज तुकाराम कुसराम यांच्या नावाने रास्त भाव दुकान आहे. सदर दुकानामध्ये यापूर्वीही अनियमितता व काळाबाजाराच्या तक्रारी झाल्याचा दावा करण्यात आला असून, दुकानावर तीन वेळा निलंबनाची तसेच चार वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, 15 मे 2025 रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. विक्की देवघरे यांनी केलेल्या तपासणीमध्ये दुकानातील गहू व तांदळाच्या साठ्यात जवळपास 135 क्विंटल धान्य कमी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाच्या धान्य साठ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत आढळणे ही गंभीर बाब असून, या कमी आढळलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम संबंधित रास्त भाव दुकानदाराकडून शासन नियमानुसार वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासणीच्या अनुषंगाने पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अंतरिम आदेश पारित केला होता. मात्र या आदेशाला जवळपास 10 महिने पूर्ण होऊनही अद्याप अंतिम सुनावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतरिम आदेशामध्ये नांदा फाटा रास्त भाव दुकानाशी संबंधित मागील तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना विहित मुदतीत वितरित करण्यात आले होते किंवा नाही, याबाबत तहसीलदार, कोरपना यांना चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2025 या तीन महिन्यांतील धान्य वितरणाची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र या बाबत अपेक्षित चौकशी झाल्याचे दिसून येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सदर रास्त भाव दुकानाशी संबंधित 100 टक्के शिधापत्रिकाधारकांची स्वतंत्ररीत्या बयाणे नोंदवून, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना किती धान्य वितरित करण्यात आले आणि किती धान्याचा अपहार झाला, याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर विगतवारीसह सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास सादर करावा, अशीही मागणी आहे. निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, रास्त भाव दुकान श्री. मनोज तुकाराम कुसराम यांच्या नावावर असले तरी ते स्वतः दुकान चालवीत नसून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये ठेकेदारीचे काम करतात. त्यांचे बंधू शैलेंद्र कुसराम हे दुकान चालवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सन 2014 ते 2026 या कालावधीत सदर दुकानासंदर्भात झालेल्या तक्रारी, चौकश्या, निलंबन व दंडात्मक कारवाईची संपूर्ण माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून संबंधित रास्त भाव दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंतिम सुनावणी तातडीने घेऊन नांदा फाटा येथील रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करावे, 135 क्विंटल धान्याच्या तफावतीची बाजारभावाप्रमाणे रक्कम संबंधित दुकानदाराकडून शासन नियमानुसार वसूल करून येथील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. रेशन दुकानाच्या तपासणीत शिल्लक साठ्यामध्ये जवळपास 135 क्विंटल गहू व तांदूळ कमी आढळले यामुळे तात्काळ दुकान काढून घेण्यात आले व कारवाईसाठी प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कारवाई न करता अंतरिम आदेश करीत लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या रास्त भाव दुकानाला परत दुकान जोडून पुरस्कृत केले आहे. अधिकारीच भ्रष्ट रेशन दुकानदाराला पाठीशी घालत असेल तर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp