Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचांदूरमध्ये ‘नमो उद्यान’ आणि नवीन अग्निशमन इमारतीचे भूमिपूजन

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचांदूर, दि. ५ : गडचांदूर शहरातील नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासोबतच शहराची सुरक्षितता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. ‘नमो उद्यान’ तसेच अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनामुळे शहराच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, मोकळा वेळ घालवण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी एक चांगली सार्वजनिक जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे. महाराष्ट्रातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमो उद्यान’ उपक्रमात गडचांदूरचाही समावेश आहे. शहराच्या गरजा लक्षात घेऊन हे उद्यान दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात येणार असून, नागरिकांना आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. याचबरोबर अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन करण्यात आले. गडचांदूरचा वाढता विस्तार आणि औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अग्निशमन दलाला आवश्यक आणि अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. आग, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला जलद प्रतिसाद देता यावा आणि त्याच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही इमारत महत्त्वाची ठरणार आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्य, विरंगुळा आणि आनंदासाठी ‘नमो उद्यान’, तर दुसरीकडे शहराच्या सुरक्षिततेसाठी सक्षम अग्निशमन सुविधा या दोन्ही विकासकामांमुळे गडचांदूर अधिक सुंदर, सुविधायुक्त आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल आहे. या वेळी नगराध्यक्ष निलेश ताजणे, उपनगराध्यक्ष संजय मेंढी, बांधकाम सभापती रामसेवक मोरे, चेतन शेंडे, नगरसेविका अर्चना मोरे, सारिका डोर्लीकर, प्रणिता उपाध्ये, अश्विनी कांबळे , मनिषा परिचाके तसेच नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp