
नागपूर :- काल दिनांक 6 सप्टेंबर 2026 ला रवी भवन येथे बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टी विदर्भ प्रदेश तर्फे बैठक रवी भवन नागपूर येथे पार पडली. वैठकीला पक्ष्याचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे विविध जिल्ह्यातून आलेले वरिष्ठ विदर्भाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हा वकील आघाडी अध्यक्षपदी एडवोकेट संजय जनबंधू यांची निवड करण्यात आली, तसेच भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी धीरज जुम्नाके यांची निवड करण्यात आली तसेच तसेच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे यांचा पक्षातील कामाचा आढावा बघून पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्या उपस्थितीत विदर्भ प्रदेश कमिटी मध्ये निवड करण्यात आली त्याबद्दल सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा






