Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफचा ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’; ८ कुख्यात माओवाद्यांना बेड्या

Author Image
Written by
नितेश शेंडे

गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीचे कंबरडे मोडत गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे राबवलेल्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत ८ कट्टर माओवाद्यांना गजाआड केले आहे. पकडण्यात आलेल्यांमध्ये दोन डीव्हीसीएम (DVCM), दोन पीपीसीएम (PPCM) आणि चार सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. या यशस्वी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा आणि रोकड जप्त करण्यात आली असून, जिल्ह्यातील माओवादी कारवाया आता जवळपास संपुष्टात आल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष कारवाईत तेलंगणा राज्यातून ४, तर मौजा कुमनार आणि मौजा नैताळा येथून प्रत्येकी २ अशा एकूण ८ माओवाद्यांना जेरबंद करण्यात आले.

Advertisement Box

फोदेवाडा चकमकीतील गुन्हेगार जेरबंद

१३ मे २०२६ रोजी तेलंगणातील रुकमापूर रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तीन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कसून चौकशीत ते पोलीस दप्तरी नोंद असलेले सक्रिय माओवादी असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये जयराम मोंगे गावडे, मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम, विजय ऊर्फ मंगडू हुंगा तामो आणि रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान समोर आले की, या चौघांचाही ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फोदेवाडा जंगल भागात झालेल्या चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येमध्ये थेट सहभाग होता. या अटकेनंतर पोलिसांनी फोदेवाडा परिसरात शोधमोहीम तीव्र करून एक .३०३ रायफल, दोन १२ बोअर बंदुका, जिवंत काडतुसे आणि माओवादी साहित्य हस्तगत केले.

कुमनारमधून डीव्हीसीएम दाम्पत्य गजाआड

१४ मे रोजी मौजा कुमनार येथे अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू असताना, दोन सशस्त्र माओवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले.

यामध्ये राजु ऊर्फ मंगडू मंगलु वेको (डीव्हीसीएम, कंपनी क्र. १०) आणि त्याची पत्नी जनी ऊर्फ नगी उंगाल येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. १०) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १ एके-४७ रायफल, १ .३०३ रायफल, १ १२ बोअर रायफल आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.

त्यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुंडेनूर जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणि रोकड जप्त करण्यात आली. यात १ एसएलआर एलएमजी, १ इन्सास एलएमजी, ३ एके-४७, ३ एसएलआर, २ इन्सास रायफल, .३०३ रायफल, बीजीएल लाँचर, ३५८ जिवंत काडतुसे आणि तब्बल ६३ लाख ८४ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

नैताळा भागातून महिला माओवादी ताब्यात

त्याच दिवशी मौजा नैताळा येथे अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेत दोन महिला माओवाद्यांना अटक करण्यात आली. ज्योती ऊर्फ अकिला ऊर्फ समिता पोटावी (डीव्हीसीएम) आणि आमती ऊर्फ आयती ऊर्फ संध्या इडमा पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. १०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ एसएलआर रायफल, १ १२ बोअर रायफल, १ सिंगल शॉट रायफल आणि इतर साहित्य जप्त केले गेले. त्यानंतर घेतलेल्या शोधमोहिमेत नैताळा जंगलातून आणखी १ इन्सास रायफल, .३०३ रायफल, ८ १२ बोअर रायफल, डेटोनेटर, बीजीएल सेल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

६४ लाखांचे बक्षीस असलेले माओवादी

पकडण्यात आलेल्या या आठही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. यामध्ये राजु वेको आणि ज्योती पोटावी यांच्यावर प्रत्येकी १६ लाख रुपये, जनी येमला व जयराम गावडे यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपये, तर उर्वरित चार माओवाद्यांवर प्रत्येकी ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.

जिल्ह्यात आता एकही नोंदणीकृत माओवादी शिल्लक नाही

या ऐतिहासिक कारवाईनंतर गडचिरोली पोलीस दलाच्या दप्तरी नोंद असलेल्या ६ पैकी ५ माओवादी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर उर्वरित एक महिला माओवादी मोनी मडावी हिने छत्तीसगडमधील बिजापूर येथे आत्मसमर्पण केले आहे. परिणामी, गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अभिलेखावर आता एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही संपूर्ण कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी फत्ते केली.

 

आज का राशिफल

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box

गुरुवार, 21 मई 2026

आज का सुविचार

जीवन एक अनमोल अवसर है, इसे केवल सांस लेने में ही न गंवाएं, बल्कि हर पल को पूरी जागरूकता और आनंद के साथ जिएं। आपके कर्म ही आपकी पहचान बनाते हैं, इसलिए हमेशा श्रेष्ठ करने का प्रयास करें।

Advertisement Box

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp