Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोली बस आगाराजवळ खासगी बसचालकाची मुजोरी; वारंवार सांगूनही दुर्लक्ष केल्याने नागरिक आक्रमक

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली: येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस स्थानकाजवळील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात खासगी बस उभी करू नये, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र, चालकाने या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुन्हा त्याच ठिकाणी बस उभी केल्याने संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत आपला संताप व्यक्त केला.

​गडचिरोली एसटी आगारासमोरील मुख्य रस्त्यावर आष्टी–गडचिरोली–वडसा–साकोली–गोंदिया मार्गावर धावणारी ही खासगी बस (क्रमांक MH 33 T 7083) थेट ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभी करण्यात आली होती. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह शालेय बस आणि दैनंदिन प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे खोळंबून मोठी कोंडी निर्माण झाली.

Advertisement Box

​काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी संबंधित खासगी बसचालकाला या ठिकाणी वाहन उभे न करण्याची समज दिली होती. तरीही चालकाने मनमानी करत पुन्हा नियम मोडल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी चांगलेच आक्रमक झाले. मोठ्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांनी बसभोवती गर्दी करत चालकाच्या या मुजोरीचा तीव्र निषेध नोंदवला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

​एसटी स्थानकाच्या अगदी बाहेर होणाऱ्या या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अरुंद होऊन पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इशाऱ्यानंतरही नियम पायदळी तुडवणाऱ्या या खासगी बसचालकावर गडचिरोली वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) तात्काळ कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp