
गडचिरोली : दागिने म्हणजे केवळ सौंदर्य खुलवणारे अलंकार नव्हेत, तर ते भावना, नातेसंबंध आणि आयुष्यभर जपलेल्या आठवणींचे प्रतीक असतात. याच सुवर्णभावनेला नवा साज देण्यासाठी प्रसिद्ध ‘रोकडे ज्वेलर्स’चे भव्य दालन आता गडचिरोलीकरांच्या सेवेत सज्ज झाले आहे. या दालनाचा उद्घाटन सोहळा आज, गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर रोडवरील हॉटेल लँडमार्कसमोर, जिंजर हॉटेलच्या बाजूला उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या आगमनाने सोहळ्याला ग्लॅमरची झळाळी मिळणार आहे.
दागिने खरेदीवर भव्य ऑफर्स आणि सवलती
उद्घाटनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. १५, १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान सोने व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) ५० टक्क्यांपर्यंत, तर हिऱ्यांच्या (डायमंड) दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर तब्बल १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी २५ टक्के सवलतीचे गिफ्ट व्हाउचरही ग्राहकांना दिले जाणार आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनच्या शुद्ध दागिन्यांची खरेदी करण्यासाठी गडचिरोलीवासीयांसाठी रोकडे ज्वेलर्सने हा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून दिला आहे.


परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख —









