
गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सच्या भव्य आणि अत्याधुनिक शोरूमचा शानदार शुभारंभ
गडचिरोली (प्रतिनिधी):दागिन्यांच्या क्षेत्रातील १२४ वर्षांहून अधिक विश्वासाचा वारसा लाभलेल्या रोकडे ज्वेलर्सने गडचिरोली शहरात आपल्या भव्य व अत्याधुनिक शोरूमचा शुभारंभ केला आहे. चंद्रपूर-मूल रोडवरील हॉटेल जिंजरजवळ हे ३,६०० चौरस फुटांचे प्रशस्त दालन सुरू करण्यात आले आहे. रोकडे कुटुंबातील वरिष्ठ सदस्य पूज्य श्री भैयाजी रोकडे आणि श्रीमती वंदना भैयाजी रोकडे यांच्यासह प्रमुख अतिथी श्री पुरुषोत्तम कावळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.या सोहळ्यास रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश भैयाजी रोकडे, डायरेक्टर श्री सारंग भैयाजी रोकडे, डायरेक्टर श्री पारस राजेश रोकडे, डायरेक्टर श्रीमती अनामिका राजेश रोकडे आणि डायरेक्टर श्रीमती संस्कृती सारंग रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या नवीन शोरूममध्ये गोल्ड, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्रायडल तसेच फाईन सिल्व्हर ज्वेलरीचे मनमोहक कलेक्शन उपलब्ध असून विवाह सोहळे, सण-उत्सव आणि दैनंदिन वापरासाठी ग्राहकांना विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमराईज्ड ज्वेलरी तयार करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त विशेष ऑफर्स:
शोरूमच्या शुभारंभाच्या निमित्ताने १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ग्राहकांसाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत
सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५०% सवलत
डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर थेट १००% सूट
प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी मेकिंग चार्जेसवर २५% सूट देणारे गिफ्ट व्हाउचर
२२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस अवघ्या ५% पासून सुरू, तसेच १८ कॅरेट प्लेन गोल्ड ज्वेलरीचे विस्तृत कलेक्शन उपलब्ध
ग्राहकांसाठी विशेष सुविधा व विस्तार योजना: ग्राहकांना मोफत कॅरेटमीटर सेवा (सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी), मोफत ज्योतिष सेवा, जुने सोने वितळवण्याच्या प्रक्रियेचे थेट रेकॉर्डिंग व पारदर्शक खरेदीची सुविधा येथे दिली जात आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरनंतर गडचिरोलीत विस्तार केल्याचे सांगत मॅनेजिंग डायरेक्टर राजेश रोकडे यांनी स्पष्ट केले की, आगामी तीन महिन्यांत यवतमाळ येथे आणि त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडसह आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे


दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन









