Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोली जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलन २८ व २९ नोव्हेंबरला देसाईगंज येथे

Author Image
Written by
लोकविजन न्युज

देसाईगंज (जि. गडचिरोली), ता. २५ : वैदू समाजाची समृद्ध लोकपरंपरा, मौखिक साहित्य, लोकसंस्कृती आणि वनौषधींच्या पारंपरिक ज्ञानाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून तसेच आरोग्य प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय संमेलन २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी देसाईगंज येथील हटवार मंगल कार्यालयात (लाखांदूर रोड, कस्तुरबा वॉर्ड) होणार आहे. मागील २४ वर्षांपासून आरोग्य शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि एकल महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य प्रबोधिनी संस्थेला या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळाली आहे. वैदू समाजाकडे पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेले पारंपरिक ज्ञान, लोककथा, दंतकथा, मौखिक इतिहास आणि वनौषधींच्या वापरासंबंधीची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच या ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून वैदू बांधवांना साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा संमेलनामागील प्रमुख हेतू आहे. सकाळी ९ वाजता जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या हस्ते ग्रंथ व वृक्ष प्रदर्शन, नोंदणी कक्ष आणि वनौषधी स्टॉलचे उद्घाटन होईल. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. श्री. गजभारे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, संवर्ग विकास अधिकारी निलेश ठाकरे आणि आमगावच्या प्रशासक रुपलता बोदेले उपस्थित राहतील. सकाळी १० वाजता राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित व जयू भाटकर यांची सन्माननीय पाहुणे म्हणून, तर आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पारंपरिक वैदू व वन्यजीव अभ्यासक मिलिंद उमरे हे संमेलनाचे अध्यक्ष, तर भाग्यवान खोब्रागडे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. सकाळी १० वाजता राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित व जयू भाटकर यांची सन्माननीय पाहुणे म्हणून, तर आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पारंपरिक वैदू व वन्यजीव अभ्यासक मिलिंद उमरे हे संमेलनाचे अध्यक्ष, तर भाग्यवान खोब्रागडे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.
संमेलनात वैदू समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचे विविध पैलू उलगडणारी व्याख्याने, परिसंवाद आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष मिलिंद उमरे ‘वैदू समाजाचे लोकज्ञान : मौखिक परंपरेपासून लिखित साहित्यापर्यंत’ या विषयावर अध्यक्षीय भाषण करतील. दुसऱ्या सत्रात गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. सविता सादमवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसाहित्य : वैदू समाजाच्या लोककथा, दंतकथा आणि आख्यायिका’ या विषयावर परिचर्चा होईल. यात संगीता ठलाल आणि भाऊराव पत्रे सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘वैदू समाजाचा मौखिक इतिहास : संशोधन आणि दस्तऐवजीकरण’ या विषयावर परिसंवाद होणार असून डॉ. मनीष भोयर आणि प्रा. डॉ. परसराम ठाकरे आपले विचार मांडतील.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत जैवविविधता उद्यानाला भेट देण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत साहित्य अभ्यास, तर ११ ते १२ या वेळेत संमेलनातील ठराव मांडण्यात येतील. दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होईल. गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सल्लागार स्मिता मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, गोंडवाना विद्यापीठाचे समन्वयक स्वप्निल गिरडे आणि आरोग्य प्रबोधिनीच्या कार्यवाह अर्चना गभने यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कुशल लांजेवार आणि मुख्य समन्वयक आरती पुराम करतील. वैदू समाजाच्या समृद्ध परंपरेचे जतन, पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या संमेलनाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी केले आहे .संमेलनाच्या पहिल्या दिवशी, शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून हटवार मंगल कार्यालयापर्यंत ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. नगराध्यक्ष लताताई सौंदरकर यांच्या हस्ते दिंडीचे पूजन होईल. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, उपनगराध्यक्ष नरेश विठ्ठलानी, प्राचार्य श्रीराम गहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. धोंडणे आणि जयंत हटवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

Advertisement Box
आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp