Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोलीत संविधान दिन उत्साहात साजरा; घटनात्मक मूल्यांचा प्रसार गरजेचा –मा. सुहास गाडे. IAS मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली, २६ नोव्हेंबर: भारतीय राज्यघटनेमुळेच देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहिले असून, भारत एक बलशाली आणि महत्त्वपूर्ण राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाची मूल्ये जपत त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे काळाची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केले.

​गडचिरोली येथील समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘संविधान दिन’ सोहळ्यात ते बोलत होते. ‘संविधान फाउंडेशन’, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची उपस्थिती होती.

Advertisement Box

​प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर मार्गावरील डॉ. आंबेडकर चौक तसेच समता पार्क परिसरात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

​पुढे बोलताना मा. सुहास गाडे. IAS मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, घटनेने प्रत्येक नागरिकाला राजकीय स्वातंत्र्य बहाल करत ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ ही लोकशाहीची भक्कम पायाभरणी केली आहे. सामाजिक व आर्थिक समतेची हमी देणाऱ्या या संविधानात हक्कांबरोबरच कर्तव्यांचेही भान करून देण्यात आले आहे. ही घटनात्मक मूल्ये समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुजायला हवीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

​सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी समाजातील उपेक्षित, दुर्बल आणि मागास घटकांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. गरजूंनी या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन करत गडचिरोली जिल्हा विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

​अध्यक्षीय मनोगतात रोहिदास राऊत यांनी भारतीय संविधानाला मानवी मूल्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ संबोधले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्वे केवळ कागदावर न राहता ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचायला हवीत. समाजातील विविध स्तरांतील विषमतेवर मात करत संविधानानेच देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवले आहे, असे मत त्यांनी मांडले. संविधानाचा प्रचार-प्रसार अधिक गतिमान करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘संविधान फाउंडेशन’चे सह-संयोजक देवानंद फुलझेले यांनी केले. सूत्रसंचालन बंडूभाऊ खोब्रागडे यांनी सांभाळले, तर विलास निंबोरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी हंसराज उंदिरवाडे, मिलिंद  बांबोडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी , भाष्कर मेश्राम, डॉ. दिलीप बारसागडे, प्रा. गौतम डांगे, माधुरी मडावी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp